अल्पयवीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी –

भुसावळ न्यायालयाने दिला निर्णय
भुसावळ (प्रतिनिधी) : – बोदवड तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी पुरुषोत्तम ऊर्फ अमोल गजानन बनारे (वय २१, रा. मनूर बु., ता. बोदवड) यास भुसावळ येथील विशेष न्यायालय यांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

आरोपीने दि. २ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी १० वाजता पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर त्याला विरोध करणाऱ्या पीडितेच्या नातेवाइकालाही मारहाण केली. या प्रकरणी त्यावेळी आरोपीविरुद्ध बोदवड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. यात सरकार पक्षातर्फे पीड़ित बालिका, वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा, तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक बारकू जाने यांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यात आरोपीला सात वर्षे शिक्षा आणि सात हजारांचा दंड ठोठावला आहे.

सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता संजय डी. सोनवणे यांनी काम पाहिले. याकामी पैरवी अधिकारी म्हणून शेख रफिक शेख कालू यांनी मदत केली.