भुसावळात यावलरोड येथे भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने भाजपा सदस्यता नोंदणी अभियान ;


भुसावळ – भारतीय जनता पार्टी सदस्यता नोंदणी अभियान दिनांक 08″जानेवारी 2025 बुधवार रोजी नामदार वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल रोड येथे भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने राबविण्यात आले.
अभियानाचे उद्घाटन भाजपा भुसावळ शहराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या हस्ते प्रदेश सचिव अजय भोळे अभियान प्रमुख किरण कोलते,नगरसेवक गिरीश महाजन,भाजपा अनु.जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष नागेश्वर साळवे,जिल्हा उपाध्यक्ष धनराज बाविस्कर,अलका शंकर शेळके,अमित असोदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यशस्वीतेसाठी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे, उपाध्यक्ष प्रेमचंद तायडे, मनोज राखुंडे, सरचिटणीस गणेश जाधव,रविंद्र दाभाडे,संतोष ठोकळ,उपाध्यक्ष गौरव वाघ,दीपक सोनवणे,नरेश खंडारे, राकेश सपकाळे,दिपक गायकवाड, दिनेश बालूरे,विकास राखुंडे,मुकेश राखुंडे यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.