विमानतळावर पतीला सोडून विवाहित प्रेयसीची प्रियकरासोबत धूम : अकोल्यातील लॉजमध्ये दोघांना पकडले –

अकोला – विवाहापूर्वीचे संबंध कायम ठेवत विवाहितेने पतीसोबत कॅनडाला जाण्यापूर्वी दिल्ली विमान तळावरून प्रियकराला घेत धूम ठोकली. पतीने तक्रार नोंदवल्यानंतर विवाहितेचा शोध सुरू असताना ती प्रियकरासोबत अकोल्याच्या लॉजमध्ये आढळली. पोलिसांनी मनधरणी करूनही विवाहिता प्रियकरासोबत राहण्यासाठी ठाम राहिली.
हरयाणा येथील एक दाम्पत्य नोकरीनिमित्त कॅनडा येथे जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर आले होते. पत्नीला कॅनडाला जायचे नसल्याने तिने प्रियकराला बोलावून घेत दिल्ली विमानतळावरून पतीला गुंगारा देत पळ काढला. त्यानंतर दोघेही उज्जैन येथे दर्शनासाठी गेले. तेथून ते अकोल्यात आले. औंढा नागनाथ येथे जाण्याच्या तयारीत असताना रात्री अकोल्यातील एका लॉजमध्ये मुक्कामी थांबले. दिल्ली पोलिसांनी प्रियकरासोबत पळ काढणार्‍या विवाहितेचे मोबाइल लोकेशन तपासले असता दोघेही अकोल्यात असल्याची माहिती मिळाली.
दिल्ली पोलिसांनी अकोला गाठले. त्यानंतर रामदास पेठ पोलिसांच्या सहकार्याने पत्नी व प्रियकराला 1 जानेवारी रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर पत्नीला पतीच्या स्वाधीन केले परंतु, पत्नीने पतीसोबत जाण्यास नकार देत प्रियकरासोबत जाण्यास पसंती दिली. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचे टाळले.