यावल – : खुनासह विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेला यावल शहरातील रेणुका माता मंदिर परिसरातील 35 वर्षीय तरुणास एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश फैजपूर उपविभागीय प्रांत अधिकार्यांनी जाहीर केल्यानंतर यावल पोलिसांनी शनिवारी तरुणाला छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सोडले आहे.
यावल पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संशयित आरोपींवर हद्दपारीची कारवाई सुरू केली आहे. यात यावल शहरातील रेणुका माता मंदिराजवळील रहिवासी देवानंद बाळू कोळी-सपकाळे (35) या तरुणावर खुनासह विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अनेक गुन्ह्यात संशयीत असून तो सध्या जामिनावर मुक्त आहे. यावलचे पोलीस अधीक्षक प्रदीप ठाकूर, हवालदार वासुदेव मराठे यांनी त्याच्यासंदर्भात हद्दपारचा प्रस्ताव सादर केला होत. व त्याला फैतपूर उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी बबन काकडे यांनी मान्यता दिली.

संशयीताला एक वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश मिळताच यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार, वसीम तडवी, गणेश गडकर यांनी देवानंद कोळी-सपकाळे याला ताब्यात घेतले व त्याला छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गलवाडा या गावात सोडले.


