भुसावळ (प्रतिनिधी)- कला, विज्ञान व पू. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथे दिनांक २९ सप्टेंबर २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पदवी प्रथम वर्ष बी ए .,बी कॉम ,बीएससी ,बीसीए व पदव्युत्तर प्रथम वर्ष एम .ए, एम. कॉम, एम .एस सी, एम सी ए विभागातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. डी .एन. पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.आर .वाणी आणि वैद्यकीय समिती प्रमुख डॉ.स्वाती फालक यांच्या उपस्थितीत शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये डॉ . केतन महाजन व डॉ . विरेंद्र महाजन– सामान्य वैद्यक तज्ञ, डॉ . चारुलता पाटील नेत्ररोग तज्ञ, डॉ.अभय जावळे–स्त्रीरोगतज्ञ , डॉ . चैतालीझांबरे– कान, नाक ,घसा तज्ञ आणि डॉ . विद्याधर भोळे– दंतरोग तज्ञ यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नियमित आरोग्य तपासणी, आरोग्यविषयक काळजी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होऊन निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित झाले. या शिबिरासाठी समिती सदस्य म्हणून प्रा.डॉ.एस.टी धूम, प्रा. डॉ प्रफुल्ल इंगोले , प्रा. डॉ. विलास महिरे, प्रा. डॉ सचिन कोलते, प्रा. अजय क्षीरसागर, प्रा गौतम भालेराव, प्रा . डॉ. दीनानाथ पाठक, प्रा. मनोज पाटिल इत्यादीनी परिश्रम घेतले. तसेच कार्यालयीन प्रबंधक श्री भगवान तायडे, कार्यालय अधीक्षक श्री. सचिन पाटील, वरिष्ठ लिपिक श्री .गिरीश आव्हाड व श्री.गणेश ठाकूर यांनी अनमोल सहकार्य केले.


