भुसावळ – भुसावळ विभागाने विशिष्ट रेल सेवा पुरस्कार सोहळा -२०२४ मध्ये एकूण कार्यक्षमता शिल्ड्स मिळविल्याने मंडळ रेल्वे प्रबंधक आणि अधिकारी यांच्या टीमचे भुसावळ येथे भव्य स्वागत करण्यात आले धरम वीर मीना, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी विशेष रेल सेवा पुरस्कार सोहळा-2024 मध्ये भुसावळ विभागाला एकूण कार्यक्षमता (ओव्हर ऑल ईफीशीएंसी) शिल्ड प्रदान केली विशिष्ट रेल सेवा पुरस्कार ” सोहळा -२०२४ मध्ये शिल्ड्स मिळविल्याने मंडळ रेल्वे प्रबंधक श्रीमती इति पांडे आणि अधिकारी यांच्या टीमचे भुसावळ येथे भव्य स्वागत करण्यात आले*

भुसावळ विभागाची टीम दि. २५.१२.२०२४ रोजी ट्रेन क्रमांक ११०५७ दादर अमृतसर एक्स्प्रेसने भुसावळ येथे पोहोचली. यावेळी टीमचे स्वागत रेल्वे अधिकाऱ्यांनी फुले व टाळ्यांच्या गजरात केले. शिल्डची झलक पाहण्यासाठी प्लॅटफॉर्म पूर्णपणे रेल्वे कर्मचारी आणि महिलांनी व्यापलेला होता. विभागीय कार्यालयात शाखा अधिकारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शिल्ड्सचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.आणि उत्साही रेल्वे कर्मचारी आणि महिलांसोबत सामूहिक छायाचित्रांचे सत्र आयोजित केले.
भुसावळ विभागाने या वर्षी त्यांच्या गुणवत्तेसाठी महाव्यवस्थापकांची एकूण कार्यक्षमता याशिवाय संरक्षा, विद्युत, सिग्नल आणि टेलिकॉम, पर्सनल व सुरक्षा या विभागात ५ स्वतंत्र शिल्ड तसेच पुणे आणि सोलापूर विभागांसोबत अनुक्रमे आणि स्टोअर्स शिल्ड आणि पर्यावरण व आरोग्य (EnHM) शिल्ड या २ शिल्ड जिंकल्या आहेत.


