भुसावळात जय गजानन मंडळ आयोजित शिवपुराण कथेस प्रारंभ ;

*भुसावळ – येथील जामनेर रोड,वरील शिवशक्ती हुडको काॅलनी रानातील महादेव मंदिरा जवळ, भुसावळ येथे शिवपुराण अखंड नामस्मरण किर्तन कथा वाचक ह.भ.प. दिलीप महाराज, बेलाड (मलकापूर) यांच्या मधूर वाणीने प्रारंभ झाला आहे
सप्ताह दैनंदिन कार्यक्रम
काकडा आरती सकाळी ५-३०ते ६-३०
कथा वाचन सकाळी ९ ते ११.३० व दुपारी २.३० ते ५
हरिपाठ संध्याकाळी ५ ते ६
किर्तन रात्री ८ ते १० पर्यंत
दिनांक दि. २२/१२/२०२४ रविवारी
सकाळी ९वा रानातील महादेव मंदिर येथुन ग्रंथ दिंडी काढण्यात आली परिसरातील महिलांनी रांगोळ्या काढून दिंडी चे स्वागत केले दुपारी शिवपुराण कथेला सुरुवात झाली व रात्री *ह.भ.प.डिंगबर महाराज चिनावलकर मठाचे गादीपती ह.भ.प.दुर्गादास महाराज यांचे किर्तन झाले*
आपल्या हिंदू संस्कृतीत स्त्रियांना व पुरुषांनी कसं जगायचं यांचे खूप छान मार्गदर्शन हभप दुर्गादास महाराज यांनी सांगितले
दि२३-१२-२४ ह.भ.प. संतोष महाराज, शेंदुर्णी
दि २४-१२-२४ ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज, मेहुणकर
दि २५-१२-२४ ह.भ.प. सुभाष महाराज, भालोद
दि २६-१२-२४ ह.भ.प. सुरेश महाराज, तळवेल
दि २७-१२-२४ ह.भ.प. मालतीताई महाराज, मध्यप्रदेश
दि २८-१२-२४ ह.भ.प. भरत महाराज, म्हैसवाडी
दि. २९/१२/२०२४, रात्री ८ वा. काल्याचे किर्तन ह.भ.प. दिलीप महाराज, बेलाड तरी परीसरातील सर्व भाविक भक्तांनी शिवपुराण कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जय गजानन मंडळ यांच्या वतीने केले आहे