सातपूर शाळा परिसरात रोड रोमियोंचा सुळसुळाट ; पोलिसांनी शाळा परिसरात गस्त वाढवावी – डॉ वृषाली सोनवणे यांची मागणी ;

;नाशिक/ सातपूर – सातपूर परिसरात काही दिवसांपासून शाळा परिसरारत शाळा, सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत रोडरोमियोचा सुळसुळाट वाढला असल्याने विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले आहे . . शिट्या वाजवणे , मोटरसायकलीचे हॉर्न वाजवणे , अश्लील हावभाव करणे मुलींची छेड काढणे असे प्रकार करून राजरोसपणे या रोमियोंचे सुरू आहेत यामुळे विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेचे व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता शाळा परिसरात पोलिस गस्त वाढवून सदर रोमियोंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी समस्त पालकवर्गाकडून करण्यात येत आहे.

सातपूर कॉलनी, अशोकनगर, श्रमिकनगर या परिसरात अनेक शाळा व खासगी क्लासेस आहेत येथे विद्यार्थी- विद्यार्थिनीं शिक्षण घेण्यासाठी ये-जा करत असतात. शाळा व क्लासेस सुटताना व भरतानाच्या वेळेत शाळेसमोर काही गुंड प्रवृत्तीच्या टवाळखोर मुलं उभे राहतात . सकाळी शाळा भरताना व सायंकाळी पाचनंतर शाळेच्या परिसरात या रोमियोंचा उपद्रव सुरू होतो. एवढेच नव्हे तर हे टोळके मुलीचा पाठलाग सुद्धा करीत असतात. मुलींचा पाठलाग करताना धूमस्टाईल गाडी चालवणे, हॉर्न जोरजोरात वाजवणे असे प्रकार घडत आहेत. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी काही पालक गेले तर दमदाटीचे करण्यात येते .

विद्यार्थिनींमध्ये असुरक्षितता व भीती ……

या छेडछाड प्रकारामुळे विद्यार्थिनींमध्ये असुरक्षितता निर्माण झाली असून परिसरात भीती पसरली आहे पोलिसांनी या रोमियोंचा त्वरित बंदोबस्त करावा , शाळेच्या वेळेत निर्भया पथक व पोलिसांनी साध्या वेशात गस्त वाढवावी अशी मागणी पालकांनी केली आहे.

शाळा परिसरात गस्त वाढवावी ……

शाळा व क्लासेससमोर उभे राहून हातवारे करणे, ट्रिपल
सीट वाहनावर बसून विद्याविनीच्या मागे जाणे, असे प्रकार घडत आहेत. पोलिसांनी शाळा व क्लासेस परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी डॉ. वृषाली सोनवणे, (शाळा विशाखा समिती, मॉडर्न हायस्कूल ) यांनी केली आहे .