सुदुंबरे ( प्रतिनिधी ) – सुदुंबरे येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त रविवार २२ डिसेंबर २०२४ ते २९ रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात रविवारी अभिषेक आणि महापूजेद्वारे गावच्या सरपंच मंगलताई कालिदास गाडे तसेच उपसरपंच बापूसाहेब तुकाराम बोरकर यांच्या हस्ते पार पडली.

या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये काकड आरती सकाळी पाच ते सहा, महापूजा अभिषेक सकाळी सात ते नऊ, गाथा पारायण सकाळी नऊ ते अकरा, भजनी मंडळाचा कार्यक्रम दुपारी दीड ते साडेतीन, प्रवचन सायंकाळी पाच ते सहा, हरिपाठ सायंकाळी सहा ते सात आणि कीर्तनसेवा रात्री सात ते नऊ आणि त्यानंतर जागर होणार आहे.
सोहळ्यामध्ये किर्तनसेवा हभप प्रवीण महाराज व्यवहारे कळमनुरीकर, ह भ प वैभव महाराज दहीतुले बाल कीर्तनकार दहीतुले वाघोली, ह भ प मुकुंदा महाराज चौधरी आळंदी, ह भ प उदय महाराज घोडके घोरेश्वर डोंगर मंदिर, हभप रामदास महाराज क्षीरसागर केडगाव, हभप गणेश महाराज आवजी येवलेवाडी, ह भ प बाळासाहेब महाराज वाळूंजकर कुडजे यांची कीर्तन सेवा होणार आहे. फुलांचे किर्तन संत तुकाराम महाराज यांचे वंशज हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांचे तर, काल्याचे किर्तन सकाळी दहा ते बारा या वेळेत दिगंबर महाराज राऊत पेन, रायगड यांचे होणार आहे.
भजनी मंडळात सुदूंबरे गावातील सरस्वती महिला भजनी मंडळ, वाघोली येथील हभपकै जगन्नाथबुवा दहीतुले दिंडी, चिंबळीतील पद्मावती महिला भजनी मंडळ, जांबवडीतील श्रीकृष्ण भजनी मंडळ, चाकणमधील शनेश्वर भजनी मंडळ, चिंबळीतील इंद्रायणी महिला भजनी मंडळ, वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ, विठ्ठलसेवा महिला भजनी मंडळ सुदूंबरे, मुकाई माता महिला भजनी मंडळ इंदुरी यांचा समावेश आहे.
प्रवचनसेवा हभप वाल्मिक महाराज सुरळकर आळंदी, ह भ प विश्वास महाराज डोंगरे चिखली, ह भ प नामदेव महाराज बिटने आळंदी, ह भ प कोंडीबा महाराज दिवेकर नाणे, ह भ प नामदेव महाराज तेली आळंदी, ह भ प उदय महाराज घोडके घोरावेश्वर डोंगर मंदिर यांची होणार आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहाचे उत्सव अध्यक्ष नरेंद्र रंगनाथ मेहेर, आकुर्डी तसेच उत्सव उद्घाटक राजेश विश्वास डोंगरे, चिखली हे असून श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे, श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळाचे अध्यक्ष नारायण क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती संस्थेचे व्यवस्थापक चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.



