नागपूर- महायुती राज्य सरकारचे खाते वाटप आज जाहीर करण्यात आले असून यात मुख्यमंत्र्यांकडे गृह खात्यासारखी महत्वाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

आज सायंकाळी मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह व उर्जा खाते देण्यात आले आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते देण्यात आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खात्याची जबाबदारी आली असून चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यालयाचा कार्यभार असणार आहे.
जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता ना. गुलाबराव पाटील यांना आधीच्याच म्हणजे पाणी पुरवठा व स्वच्छता खाते आलेले आहे. ना. गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण ) व आपत्ती व्यवस्थापन खाते मिळालेले आहे तर, ना. संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी प्रदान करण्यात आलेली आहे.
दरम्यान, आता खाते वाटप झाल्यानंतर पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष करून तिन्ही मंत्र्यांपैकी जळगाव जिल्ह्याची धुरा कुणाकडे येणार ? याबाबत चर्चा सुरू झालेली आहे.
राज्य सरकारचे खाते वाटप –
1) देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, कायदा आणि न्यायव्यवस्था
2) एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण
3) अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन
4) चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
5) राधाकृष्ण विखे- पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
6) हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
7) चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
8) गिरीश महाजन – जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)
9) गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा आणि स्वच्छता
10) गणेश नाईक – वनमंत्री
11) दादा भुसे – शालेय शिक्षण
12) संजय राठोड – जलसंधारण
13) धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा
14) मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास
15) उदय सामंत – उद्योग आणि मराठी भाषा
16) जयकुमार रावल – मार्केटिंग आणि प्रोटोकॉल
17) पंकजा मुंडे – पर्यावरण आणि हवामान बदल, पशुपालन
18) अतुल सावे – ओबीसी, डेअरी विकास आणि अक्षय ऊर्जा
19) अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
20) शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
21) आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
22) दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
23) अदिती तटकरे – महिला व बालविकास
24) शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
25) माणिकराव कोकाटे – कृषी
26) जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
27) नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
28) संजय सावकारे – कापड वस्त्रोद्यक
29) संजय शिरसाट – सामाजिक न्याय
30) प्रताप सरनाईक – वाहतूक
31) भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
32) मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
33) नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
34) आकाश फुंडकर – कामगार
35) बाबासाहेब पाटील – सहकार
36) प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण


