ईव्हीएमच्या विरोधात भुसावळात काँग्रेसचे ईव्हीएम हटाओ संविधान बचाओ स्वाक्षीरी अभियान संपन्न ;

भुसावळ- भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशनजवळील छत्रपती शिवाजी पुतळाजवळ भुसावळ काँग्रेस कमिटीच्या वतीने ईव्हीएम हटाओ, संविधान बचाओ अभियानाला सुरूवात करून स्वाक्षरी मोहिती राबविण्यात आली. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. ही मोहिम भुसावळचे माजी आमदार निळकंठ फालक, लोकसभाचे जिल्हाध्यक्ष भगतसिंह पाटील, अल्पसंख्यांकचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद मुनव्वर यांनी स्वाक्षरी करून अभियानाला सुरूवात केली आहे.

ईव्हीएम हटाओ संविधान बचाओ स्वाक्षीरी अभियान संपन्न

महाराष्ट्रचे प्रभारी खासदार चीन्नी थला महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी चे अध्यक्ष आमदार नाना पटोले ,प्रदेश उपाध्यक्ष व जळगांवची प्रभारी श्रीमती प्रतिभा ताई शिंदे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर ईव्हीऐम हटाओ संविधान बचाओ स्वाक्षीरी मोहीम अभियान राबवण्यात येत आहे या अनुषघाने भुसावळ कॉग्रेंस कमेटी तर्फे दीनांक १७/१२/२४ रोजी रेल्वे स्टेशन शिवाजी पुतळा भुसावळ येथे आज १२ वाजे पासुन दोन वाजे पर्यंत ईव्हीएम हटाओ देश बचाओ स्वाक्षीरी मोहीम झाली यावेळी भुसावळचे माजी आमदार निळकंठ फालक, रावेर लोकसभाचे जिल्हा कार्य अध्यक्ष भगतसिंह पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्यक विभाग मो मुनव्वर , यांनी स्वतः सही करुन या अभियांनाला सुरवात केली . प्रसंगी यामोहिमेस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतीसाद दिला नागरिकांनी स्वतः येऊन सही करून घोषणा दिल्या ईव्हीऐम हटाओ भाजपा भगाऔ या वेळी ५०० सह्या ची स्वाक्षीरी करण्यात आली

सदर मोहीम शहरात विविध भागात सप्ताहभर सुरू राहील या प्रसंगी वंचित आघाड़ी चे संजय ब्रामने,युथ काँग्रेस चे ईम्रान खान, जगपाल सिंह गिल, सेवादल चे संजय खडसे,ईटकचे विलास खरात, महीला कॉग्रेंस ची यास्मीन बानो, रानी खरात, वंदना चव्हाण, राष्ट्रवादीच्या संगीता भामरे,असगर शेख, फीरोज खान, नरेन्द्र मस्के, सलीम पटेल,रहीम शेख,ऐजाज भाई,व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते