भुसावळ :- जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळ या संस्थेच्या गुणवंत सभासदांचा व गुणवंत सभासद पाल्यांचा गुणगौरव सोहळा समारंभ कार्यक्रम दिनांक 15/12/2014 रविवार रोजी पार पडला. त्यात सन 2023 – 24 मध्ये झालेल्या पदवी इयत्ता बारावी इयत्ता दहावी तसेच इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती मध्ये तालुक्यातून प्रथम येणाऱ्या सभासद पाल्यास तसेच शासकीय चित्रकला एलिमेंट्री इंटरमिजिएट परीक्षेत श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या व राज्यस्तरीय,तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या सभासद पाल्यांना प्रशस्तीपत्र स्मृतीचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष एस डी भिरूड होते प्रमुख पाहुणे जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एच जी इंगळे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतपेढीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी केले सर्वप्रथम संस्थेचे जेष्ठ सभासद सुरेश उत्तम डांगे यांना देखील शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक बोर्ड मेंबर म्हणून प्रा शैलेश राणे व श् जे. पी. सपकाळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला सौ.अश्विनी योगेश कोळी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल, शंकर साळुंखे यांचाव उच्च संपादन प्राप्त विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक वातावरण, शैक्षणिक वातावरण आणि संपादन ओके सहाय्यभूत ठरणाऱ्या घटकांचा विश्लेषणात्मक अभ्यास पीएचडी, सुरेश ब्रिजलाल परदेशी व प्रशांत रमेश धांडे यांना महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास गट संशोधन मंडळ बालभारती या अभ्यास गटावर सदस्य निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
गुणवंत पाल्यांना प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. याप्रसंगी शैलेश राणे यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याचा सल्ला दिला. एच जी . इंगळे. यांनी विद्यार्थ्यांनी काय वाचावे , काय बघावे व काय करावे यासंदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन केले. पतपेढीच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष एस डी भिरूड यांनी गौरवोद्गार काढले सभासदांना जास्तीत जास्त सेवा पुरवण्यासाठी पतपेढी ही बांधिल आहे असे मार्गदर्शनातून त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे जीवनामध्ये हा सत्कार खूप महत्त्वाचा असतो आणि विद्यार्थ्यांनी तो स्वीकारला त्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले पतपेढीच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी भुसावल पतपेढीचे माजी अध्यक्ष डी ए पाटील, नितीन महाजन जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक डी. ए. पाटील, सिद्धेश्वर वाघुळदे कलाध्यापक संघटनेचे अरुण सपकाळे, कैलास चौधरी, अजित पाटील,रावेर माध्यमिक पतपेढीचे सचिव डी. के. पाटील भुसावल माध्यमिक पतपेढीचे चिटणीस गोपाळ महाजन खजिनदार श्री ज्ञानेश्वर मोझे सर उपाध्यक्ष सौ अश्विनी कोळी संचालक राजूभाऊ लवांडे, शैलेंद्र महाजन , चेतन तळेले , नरेंद्रकुमार दोडके , व्ही व्ही पाटील. दीपक जगन्नाथ गुळवे , अमितकुमार परखड, प्रशांत सोनवणे ,तज्ञ संचालक डॉ. प्रदीप साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.व सर्व कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्रकुमार महाजन व संचालक प्रशांत सोनवणे यांनी केलं तर आभार प्रदर्शन संस्थेच्या उपाध्यक्ष सौ अश्विनीताई कोळी यांनी केले.


