जळगावात धमकी देऊन तरुणीवर अत्याचार ;

जळगाव,

जळगाव शहरातून धक्कादायक घटना उघड झालीय. आयोध्या नगरात परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. राहुल योगराज पाटील (वय २६, रा. आयोध्या नगर, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरातील एका भागात २२ वर्षीय तरुणीही आपल्या कुटुंबासह राहते. दरम्यान १ जानेवारी २०२४ रोजी तरुणी आंघोळ करत असताना संशयित आरोपी राहुल पाटील याने नकळत तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर त्याने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.

दरम्यान हा प्रकार असाह्य झाल्याने तिने अखेर एमआयडीसी पोलिसातून तक्रार दिली. त्यानुसार संशय आरोपी राहूल पाटील याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे हे करीत आहे.