मुक्ताईनगर

परभणी येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लावलेल्या भारतीय संविधान कोनशीला तोडफोड करून एका माथेफिरुने विटंबना केली होती. त्यामुळे परभणी शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि ज्या व्यक्तीने विटंबना केली त्याच्या विरोधात पोलीस प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी भूमिका घेतली आंबेडकरी संघटनांकडून घेण्यात आली होती.
या प्रकरणा संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात आंबेडकरी संघटनांकडून व समाज बांधवांकडून निषेध करून निवेदन देखील देण्यात आली होती. या आंदोलनामध्ये परभणी शहरात पोलिसांनी बळाचा वापर केला त्यामध्ये बरेच भीमसैनिक जखमी झालेले आहेत 400 हून अधिक भीमसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या युवकाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशी विधी शाखेच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी होता. तरीसुद्धा पोलीस प्रशासनाने दगडफेकीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याला आरोपी केले होते आणि कोठडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झाल्यामुळे आंबेडकरी संघटना व समाज अजूनच आक्रमक झाले असून, त्याच अनुषंगाने आनंदराज आंबेडकर यांनी 16 डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.
मुक्ताईनगर मध्ये सुद्धा तीव्र पडसाद उमटताना दिसून आले 16 डिसेंबर रोजी सकाळपासूनच सायंकाळी उशिरापर्यंत संपूर्ण मुक्ताईनगर शहरातील बाजारपेठ बंद होती. यावेळी वंचित बहुजन आघाडी, आरपीआय, ऑल इंडिया पॅंथर सेना व विविध आंबेडकरी संघटना यांनी बाजारपेठ बंद करून कडकडीत बंद पुकारल्याचे चित्र मुक्ताईनगर मध्ये पहावयास मिळाले.


