रावेर – विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवणे, लोकशाही मूल्यांची रुजवणूक करणे आणि कायद्याबाबतची जनजागृती करण्यासाठी रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील डी. एस. देशमुख हायस्कूल व विधी सेवा समिती, भुसावळ तसेच देवगिरी कल्याण आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने विधी जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थी व नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची माहिती देणे आणि गरजू व्यक्तींना न्याय मिळवण्यासाठी सहाय्य करणे हा होता. कार्यशाळेची वैशिष्ट्ये व चर्चेतील मुद्दे विधी सेवा समितीची भूमिका गरीब व वंचितांसाठी मोफत कायदेशीर सल्ला प्रदान करणे. न्यायालयीन प्रकरणांसाठी विनामूल्य सहाय्य. तंटामुक्त गाव अभियानांतर्गत तंटे सोडवणे. व्यक्त होणे शिकावे, हा संदेश दिला.
तसेच यावेळी बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांच्यासह झाशीची राणी या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाविषयी प्रेरणादायक माहिती दिली. कार्याची माहिती जयश्री देशमुख व अँड. जास्वंदी भंडारी यांनी दिली

तर अँड. जास्वंदी भंडारी यांनी दिव्यांग व्यक्तींना दिलेल्या कायदेशीर हक्कांविषयी मार्गदर्शन केले यावेळी भंडारी यांनी मुलींना व मुलांना आई-वडील आपल्याला शाळेत अभ्यास करून एक चांगला मुलगा देशाचा चांगला नागरिक तसेच उज्वल भविष्यासाठी शाळेत पाठवता असतात त्यांनी बघितलेल्या भविष्याला तळाला जाऊ न देता त्यांचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे कोणत्याही गुन्हेगारी मार्गाकडे व चुकीच्या मार्गाकडे मुला-मुलींनी जाऊ नये व आपल्या भविष्य खराब करू नये असेही यावेळी अँड. जास्वंदी भंडारी यांनी सांगितले . तसेच अँड. कैझर भारमल यांनी विधी सेवा समितीची कार्यपद्धती व सेवा समजावून सांगितली.

कायदेशीर हक्कांची माहिती मूलभूत अधिकार, महिला व बालहक्क याविषयी सखोल चर्चा सायबर गुन्हे व त्यावरील उपाययोजना. मोफत विधी सेवा योजनेचा लाभ कसा घ्यायचा याविषयी मार्गदर्शन केला व अशा कार्यक्रमांचे माहिती पालक किंवा शिक्षकांना आयोजन भविष्यातही करण्याची अपेक्षा व्यक्त केली
विद्यार्थ्यांसाठी संदेश अँड. प्रफुल्ल पाटील यांनी पोस्को कायदा ( Pocso Act) तसेच चांगला स्पर्श व वाईट स्पर्श यातील फरक समजावून सांगितला.
सत्कार शाल, गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचा सत्कार व आयोजन कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर यांनी केले महिला तक्रार निवारण समितीच्या भगिनी सदस्य सौ. जयश्री प्रविण चौधरी व सौ. नयना ज्ञानेश्वर चौधरी यांनी महिला वक्त्यांचा सन्मान केला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन युवराज कुरकुरे यांनी केले. दर्शनी फलक लेखन कला शिक्षक एस. बी. सपकाळे यांनी केले. मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांनी प्रासंगिक उदाहरणे देऊन मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांचा परिचय पर्यवेक्षक डी. के. पाटील यांनी करून दिला. संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी चेअरमन चंद्रकांत चौधरी सचिव पवन चौधरी सहसचिव रामराव देशमुख सर्व सन्माननीय संचालक बंधु भगिनी यांनी या कार्यक्रमाचे अभिनंदन कौतुक केले आहे. या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने हजेरी लावली.



