‘
भुसावळ : येथील नाहाटा काॅलेज जवळील गायत्री नगरातील उपासना केंद्रातर्फे दि.१४ रोजी दत्त जयंती निमित्त ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या गजरात आनंदात व उत्साहात श्री दत्त पालखी काढण्यात आली.

दत्तसेवेच्या कार्यक्रमात दुपारी ४ ते संध्या. ८ या दरम्यान श्री. दत्त-जन्म, दत्ताचा पाळणा , सामुहिक दत्त पुजन करण्यात आले.
पालखीचा मार्ग गायत्री नगर, विकास कॉलनी असा होता. श्रींच्या पालखी मार्गात रहिवासी भाविकांनी ठिकठिकाणी उत्स्फुर्तपणे सडा-सारवण व समयोचित रांगोळ्या काढुन श्रींची आरती व पदे म्हणून आळवाणी केली. तद्नंतर श्रींची प्रतिमा मुळस्थानी येऊन तेथे उपासना करीत सदगुरूंचा अखंड कृपावर्षाव सर्वांवर होत राहो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुशील कुलकर्णी, मिलिंद कुळकर्णी सह आदींनी सेवा केली.




