भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळाची यादी आली समोरप्रतिक्षा संपली : उद्या शपथविधी होणार

मुंबई,-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. उद्या रविवार दि. 15 डिसेंबर रोजी भाजपचे 21, शिवसेनेचे 12 राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 किंवा 4 वाजता शपथविधी होईल.
उद्या राज्यमंत्री मंडळाचा विस्तार नागपुरात होणार आहे. याआधी 1991 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात झाला होता. 1991 ला ज्यावेळी शिवसेना फुटली, त्यानंतर छगन भुजबळ गटाने बंड करत काँग्रेस सोबत शपथ घेतली. 33 वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम हा नागपुरात होणार आहे. याचदरम्यान महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे.

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

  • देवेंद्र फडणवीस
  • गिरीश महाजन
  • रविंद्र चव्हाण
  • मंगलप्रभात लोढा
  • चंद्रशेखर बावनकुळे
  • आशिष शेलार
  • नितेश राणे
  • शिवेंद्रसिंहराजे भोसले
  • राहुल कुल
  • माधुरी मिसाळ
  • संजय कुटे
  • राधाकृष्ण विखे पाटील
  • गणेश नाईक
  • पंकजा मुंडे
  • गोपीचंद पडळकर

शिवसेना शिंदे गटाची यादी

  • एकनाथ शिंदे
  • उदय सामंत
  • शंभूराजे देसाई
  • गुलाबराव पाटील
  • दादा भुसे
  • प्रताप सरनाईक
  • संजय शिरसाठ
  • भरत गोगावले
  • आशिष जयस्वाल
  • योगेश कदम
  • विजय शिवतारे
  • आबिटकर किंवा यड्रावकर

अजित पवार गटाच्या मंत्र्यांची यादी

  • छगन भुजबळ
  • आदिती तटकरे
  • अनिल पाटील
  • संजय बनसोडे
  • अजित पवार
  • मकरंद पाटील
  • नरहरी झिरवाळ
  • धनंजय मुंडे

आश्वसने दिली, ती पूर्ण करु : फडणवीस
राज्याला स्थिर सरकार मिळावे अशी जनतेची अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार आहोत, 2100 देखील देणार आहोत, बजेटच्या वेळी त्याचा विचार करु, आर्थिक सोर्सेस योग्य प्रकारे चॅनेलाईज झाल्यानंतर ते करता येते. जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करु, निकषात असतील त्यांना लाभ मिळेल, निकषाच्या बाहेरच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पूनर्विचार करु, मात्र सरसकट पूनर्विचार करणार नाही, असे देवेंद्र फडवणीस म्हणाले.