संचारबंदीत सुद्धा भुसावळकरांची त्रेधा ; अ‍ॅक्टीव्हात शिरला साप अन् वाहनधारकाची उडाली भंबेरी – सर्पमित्र राहुल आराक यांनी दिले सापाला जीवदान

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील शांती नगर, विमल पाटील नगरातील रहिवासी असलेल्या तरुणाच्या अ‍ॅक्टीव्हात गुरुवारी सकाळी साप शिरल्याने या तरुणाची चांगलीच भंबेरी उडाली तर साप पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली. त्याचवेळी सर्पमित्र राहुल आराक हे कामानिमित्त या भागातून जात असताना त्यांनी सर्पाला जीवदान देत त्याला दुचाकीतून बाहेर काढत जुगादेवी जंगल परीसरात सोडून दिले.
सापामुळे उडाली
भुसावळ हायस्कूलचे शिक्षक असलेले प्रभाकर इंगळे यांच्याकडे अ‍ॅक्टीव्हा दुचाकी असून त्यांचा मुलगा गुरुवारी सकाळी १० वाजता कामानिमित्त घराबाहेर पडला मात्र काही अंतरावर गेल्यानंतर त्याच्या पायावर साप पडल्याने त्याची भीतीने चांगलीच त्रेधा उडाली व त्याने रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून जाणार्‍या -येणार्‍यांकडे मदत मागितली व त्याचवेळी येथून कामा निमित्त सर्प मित्र राहुल अशोक आराक हे जात असतांना त्यांनी सर्पाला जीवदान देत त्याची सुटका केली व नंतर या सापाला जुगादेवी जंगल परीसरात सोडून दिले. तस्कर जातीचा बिनविषारी साप असल्याचे आराक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *