भुसावळ – आ.संजय सावकारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून
दि.11 डिसेंबर रोजी आ.संजय सावकारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिष्ठा मंडळातर्फे शहरातील नाहाटा महाविद्यालय चौफुलीजवळ, अष्टभूजा मंदिराजवळ तसेच रेल्वे स्थानक परिसरात उघड्यावर वास्तव्यास असलेल्या शंभरावर गरजूंना शाल, चिवडा व बिस्कीटाचे वाटप आ.सावकारे व रजनी सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठा मंडळ अध्यक्षा सौ रजनी सावकारे यांचेसह प्रतिष्ठा मंडळाच्या सर्व सदस्या व मान्यवर उपस्थित होत्या .


