भुसावळात श्री दत्त जयंतीनिमित्त निघणार पालखी

भुसावळ : येथील नाहाटा काॅलेज जवळील गायत्री नगरातील उपासना केंद्रातर्फे दि.१४ रोजी दत्त जयंती निमित्त पालखी काढण्यात येणार आहे.

दुपारी ४ ते संध्या. ८ या दरम्यान श्री. दत्त-जन्म, दत्ताचा पाळणा , सामुहिक दत्त पुजन : नामावली अर्थात तुलसी-दल, बिल्व-पत्र इत्यादींनी अर्चन, त्यानंतर श्रींची पालखी निघेल. तरी भाविकांनी उपासना केंद्रात उपस्थित राहून सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुशील कुळकर्णी, मिलींद कुळकर्णी यांनी केले आहे.