उपमुख्यमंत्री अजीत पवारांनी दिलेली कौतुकाची थाप निश्चितच प्रेरणादायी – डॉ. कीर्ती फलटणकर

भुसावळ (प्रतिनिधी )- राज्याचे उपमुख्यमंत्री
ना .अजित पवारांनी दिलेली कौतुकाची थाप निश्चितच प्रेरणादायी व आम्हा मेडिकल क्षेत्रात कार्य करणाऱ्यां करीता प्रोत्साहन वाढवणारीअसून यामुळे नक्कीच अजुन दुप्पट बळ वाढेल -असे मत डॉ कीर्ती फलटणकर, पालिका वैद्यकीय अधिकारी यांनीव्यक्त केले .
कोरोना आजाराबाबत सर्वजण अहोरात्र झटत आहेत नागरिकांचाही यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे लोकप्रतिनिधींच्या मार्फत सुद्धा नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक कौतुकाची थाप दिली आहे ते नक्कीच आम्हाला प्रेरणादायी आहे या पुढेही आम्ही काम करत असताना अशी कौतुकाची थाप पाठीवर असल्यामुळे निश्चितच काम करताना आम्हाला दुप्पट बळ वाढेल
असे मत भुसावळ येथील नगरपालिका रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ किर्ती फलटणकर व डॉ तोसिफ खान यांनी व्यक्त केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *