व्यवस्थापकांनी हिंदी राजभाषेस प्रशासकीय कामकाजाचा अविभाज्य भाग बनवावा – आवाहन भुसावळ विभागात राजभाषा कार्यान्वयन समितीची बैठक संपन्न ;

भुसावळ – विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात दिनांक 09 डिसेंबर 2024 राजभाषा कार्यान्वयन समितीची बैठक यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इती पांडे होत्या. बैठकीत अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) श्री एम. के. मीणा तसेच सर्व वरिष्ठ शाखा अधिकारी, व समितीचे सदस्य उपस्थित होते.

या प्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी हिंदी राजभाषेच्या अधिकाधिक वापरावर भर देताना ती प्रशासकीय कामकाजाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन केले. त्यांनी हिंदीच्या प्रभावी उपयोगाद्वारे प्रशासन अधिक सुलभ व सर्वसामान्यांसाठी सुसंवाद साधणारे बनविण्यावर जोर दिला.

बैठकीचे सूत्रसंचालन राजभाषा अधिकारी, भुसावळ यांनी केले. या दरम्यान, विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी हिंदीच्या प्रचार व प्रसारासाठी घेतलेल्या पुढाकारांबाबत आपले अनुभव सांगितले.