रावेर :
रावेर येथे २२ मार्च रोजी जनता कर्फ्यु रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमिवर लागू असलेल्या संचारबंदी बंदोबस्त दरम्यान पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरु केले असून रावेर येथील एका इसमाचे घरात मोठ्या प्रमाणात अवैध इंधन यामध्ये रॉकेल पेट्रोल,डिझेलचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवल्याचे आढळले आहे . याबाबत संशयीत आरोपीसह मुद्देमाल ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
रावेर येथे झालेल्या दंगली च्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपीच्या धरपकड कार्य सुरु केले आहे .अश्या वेळी
कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान एका घराची तपासणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस एका घरातील नाईक नंदलाल पाटील,पो कॉ भगवान पाटील ,पोकॉ सुरेश मेढे , पंकज राठोड , राहुल कोळी, महिला कर्मचारी विशाखा तुपे, सोनाली साळुंखे,अश्यांनी रावेर पोलीस स्टेशन हद्दीत कोंबिंग ऑपरेशन केले .यावेळी संशयीत आरोपी शे शरीफ शे मुस्लिम रा रावेर यांचे कब्जात -200 लिटरचे रॉकेल भरलेले 14 ड्रम , व 100लिटर डिझेंल,व 70 लिटर पेट्रोल असे साहित्य मिळून आले . मुद्ददेमालसह शे.शरीफ याला आरोपी रावेर पो स्टे यांच्या ताब्यात दिले. आरोपीवर पुरवठा निरीक्षक हर्षल विश्वनाथ पाटील ,प्रवीण पाटील, लिपिक तहसील ऑफिस रावेर दादाराव कांबळे ,तलाठी रावेर यांच्या उपस्थितीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



