भुसावळात चंपाषष्टी निमित्त हाेणार ‘यळकाेट यळकाेट ‘ जय मल्हार ‘ चा गजर ;

भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील नाहाटा काॅलेज चाैफुली जवळील श्री खंडोबा मंदिरात शनिवार दि.७ राेजी चंपाषष्टी रोजी खंडेरायाच्या नवरात्रोत्सवाची सांगता होत असून यानिमित्त खंडेरायाचा अभिषेक व प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .


दरम्यान ७ रोजी प्रारंभी सकाळी श्री खंडोबास अभिषेक पूजाचर्ण करण्यात येईल तदनंतर भरीत व भाकरीचा महा नैवेद्य दाखवण्यात येईल भंडारा उधळीत यळकाेट यळकाेट जय मल्हार च्या गजरात भाविक श्री खंडाेबा रायाचे दर्शन घेवून आशीर्वाद घेतील.
तसेच भाविक घराेघरी आप्त स्वकीयांच्या उपस्थितीत दिवटी बुधलीसह सवाद्य खोबर व भंडारा उधळतील.