भुसावळ – हॉटेल मधून जेवण करून फिरायला जात असलेल्या विक्रम जाधव 68 राहणार राका नगर भुसावळ यांना अज्ञात चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला हा अपघात मंगळवारी रात्री घडला या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे शहरातील एका भागात विक्रम जाधव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते मंगळवारी रात्री नऊ वाजता विक्रम जाधव यांचे मित्र सुभाष शुक्ला व रविशंकर जैन यांच्या सोबत साक्री फाट्या जवळ हॉटेल मधुवन येथे जेवण केल्यानंतर फिरायला निघाले होते त्यावेळी जळगावच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात चार चाकी वाहनाने विक्रम जाधव यांना धडक दिली यात त्यांचे डोक्याला जोरदार मार व हातापायाला दुखापत झाल्याने विक्रम जाधव यांचा जागेवरच मृत्यू झाला दरम्यान या अपघाता बाबत भुसावळ बाजरपेठ पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .



