विवाहितेची फसवणूक प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल:

भुसावळ -पहिले लग्न झालेले असतांनाही घटस्फोट झाल्याचे भासवून 29 वर्षीय महिलेशी दुसरे लग्न केले लग्नानंतर झालेला मुलगा दत्तक देण्यासाठी बळजबरी करत विवाहितेचा छळ केला व दागिनेही हडपले या प्रकरणी सात जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

जळगावच्या कांचन नगरातील रहिवासी विवाहितेचा छळ संशयीत शरद छगन सैंदाणे, छगन महादू सैंदाणे , आशा हर्षल सैंदाणे रा. नांदेड तालुका धरणगाव , सुनील सोनवणे , रेखा सुनील सोनवणे मयूर सुनील सोनवणे सर्व राहणार जामनेर सचिन सैंदाणे नांदेड तालुका धरणगाव हल्ली मुक्काम पुणे हे करीत होते त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

संशयित शरद सैंदाणे याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला नसताना तसे विवाहितेला भासवत दुसरे लग्न केले विवाहितेला झालेले मुल हे आशा सैंदाणे यांना दत्तक देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला तिला शिवीगाळ केली आणि तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले विवाहितेला माहेरी सोडून देत तिची फसवणूक केली म्हणून तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करत आहे