भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता देश संकटात असतांना मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही ,म्हणून कोणीही शुभेच्छा देण्याकरीता घराबाहेर पडू नका आपण सुरक्षित तर देश सुरक्षित आपल्या सर्वांचे निरोगी आरोग्य याच आपल्या शुभेच्छा माझ्यासाठी असेल असे मी समजेल ,कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता सचिन चौधरी यांचे सर्व हितचिंतक ,चाहते, प्रेमी मित्रमंडळ, यांचे सह सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन सचीन चौधरी यांनी केले आहे . येथील कृषी उत्पन्न बाजार सामिती सभापती सचिन संतोष चौधरी यांचा २५ मार्च रोजी वाढदिवस असल्याने शहरातील संतोष चौधरी, अनिल चौधरी व चौधरी परीवारावर प्रेम करणारे सर्व माझे वडीलधारी मंडळी, स्नेही, हितचिंतक, मित्र परीवार यांना ज्ञात आहे की, येत्या दि. २५/०३/२०२० रोजी माझा वाढदिवस आहे .मात्र देशात व महाराष्ट्रात कोव्हीड-१९ विषाणूच्या होत असलेल्या संसर्गामुळे आरोग्यविषयक आणीबाणीसदृष्य परीस्थिती निर्माण झालेली आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाने योग्य त्या सर्व उपाययोजना करण्याकरिता आवश्यक निर्देश जारी केलेले आहेत. सध्याचे राज्यावर व देशावर असलेले हे संकट महाभयंकर असून या कोरोना विषाणू विरुध्दच्या लढयाची सर्व सुत्रे ही देशातील नागरीकांकडे असून कोव्हीड-१९ च्या प्रसारास प्रतिबंध घालणे हे सर्वस्वी नागरीकांच्या हातात असल्याने मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही. तरी कोणीही पुष्पगुच्छ, पुष्पमाला घेऊन मला भेटायला व शुभेच्छा दयायला घराच्या बाहेर पडू नये व भेटायला येवू नये . आपल्या शुभेच्छा सोशल मिडीया, फोनवरुन, संदेश इ. व्दारे दयाव्यात . आपण फलक/बॅनरव्दारे दिलेल्या शुभेच्छा मला मिळालेल्याच आहे. आपले आरोग्य निरोगी, सुदृढ राहावे हीच माझ्या जन्मदिनी माझी प्रामाणीक इच्छा आहे., शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ३१ मार्च पर्यंत अनावश्यकरित्या घराच्या बाहेर पडू नये, कुठल्याही परीस्थितीत प्रवास करु नये. आपले व आपल्या कुटुंबियांचे निरोगी आयुष्य हीच माझ्या जन्मदिवसाची मला अमूल्य भेट ठरणार असल्याचेही सचिन चौधरी यांनी कळकळीने आवाहन केले आहे.



