भुसावळ – (प्रतिनिधी )
येथील भाजपाचे माजी नगरसेवक तथा भाजपचे ओबीसी मोर्चा प्रदेश
सरचिटणीस अजय भोळे यांना जळगाव येथील एकाने भ्रमणध्वनी वर जीवे ठार मारण्याच्या धमकीचा मेसेज पाठवल्याने खळबळ उडाली आहे . या बाबत अजय भोळे यांनी शहर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे .
९१७७४४८८८३६६ या भ्रमणध्वनी वरुन मादरचोद ९० दिवसाच्या आत तुमचा ३०२ करतो माझे नाव राजेन्द्र अमर आहे राहणार व्यंकटेश नगर जळगाव महाराष्ट्र.८६९८६२०२४ व ७९०२१२०५३६३ असे अजुन दोन भ्रमणध्वनी क्रमांक खाली दिले आहे . असा मेसेज भोळे यांना त्यांच्या भ्रमणध्वनी वर आला. यामुळे अजय भोळे यांनी शहर पोलिसात त्वरित या धमकी बाबत लेखी तक्रार दिली असून या मेसेजची गांभीर्याने दखल घेवून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार अजय भोळे यांनी दिली आहे



