भुसावळ – श्रीमद्भगवद्गीता जयंती निमित्त सकल लेवा महिला मंडळ भुसावळ परिसर आयोजित व ए एस पी फाउंडेशन भुसावळ प्रायोजित लहान मुलां-मुलींसाठी श्रीमत भगवद्गीता पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .

स्पर्धा स्थानिक भागीरथी प्राथमिक विद्यामंदिर ,सोनिच्छा वाडी जामनेर रोड ,भुसावळ दिनांक 7 डिसेंबरोजी दुपारी दोन वाजता घेण्यात येणार आहे . यामध्ये पहिली ते चौथी प्रथम गट , पाचवी ते आठवी द्वितीय, नववी ते बारावी खुलागट, याप्रमाणे स्पर्धा होतील सविस्तर माहितीसाठी इच्छुक मुला -मुलींनी पुढील नंबर वर संपर्क साधावा
प्रकल्प प्रमुख प्रभावती पाटील 99 236 31 770.
स्वाती भोळे- 94227-33433. मनीषा पाटील- -98224-34570. ह.भ.प.दीपक महाराज शेळगावकर-
98 23 51 09 33 ह .भ. प .प्रल्हाद महाराज ढाके -77982-00794.
प्रत्येक गटातून तीन आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत तरी जास्तीत जास्त मुलामुलींनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे .


