मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे चंद्रकांत निंबा पाटील दणदणीत विजयी तर महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे पराभूत

मुक्ताईनगर – मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून झालेल्या लक्षवेधी लढतीत महायुतीचे चंद्रकांत निंबा पाटील हे पुन्हा विजयी झाले आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार रोहिणी खडसे-पराभूत झाल्या आहेत मुक्ताईनगर मतदारसंघात एकुण २१५०११ मतदान झाले त्यापैकी महायुतीचे उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील यांना १,११,६०१ मते मिळाली तर महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांना ८७,६५६ मते मिळाली यात महायुतीचे चंद्रकांत निंबा पाटील हे २३,९४५ मतांनी विजयी झाले