भुसावळात आमदार संजय सावकारेंचा सलग चौथ्यांदा विजयाचा चौकार ; विरोधकांचा दारुण पराभव ;

भुसावळ – कुठल्याही नेत्यांची न झालेली सभा, विरोधकांनी टीकेचे बाण चालवल्यानंतरही केवळ मतदारसंघात केलेली कामे व शासनाच्या जनताभिमुख योजनांचा प्रसार करीत आमदार संजय सावकारे चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले व जनतेने विशेषतः लाडक्या बहिणीनी चौथ्यांदा विजयाचे आशीर्वाद दिले.

कार्यकर्त्यांचा जल्लोष
भुसावळ तहसील कार्यालयाच्या गोदामात शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. दुपारी एक वाजता निकाल समोर येताच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजर व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. आमदारही यावेळी कार्यकर्त्यांसोबत थिरकले. आता भुसावळच्या वाट्याला निश्चितपणे मंत्री पद येईल, अशी आशा कार्यकर्त्यांना आहे.

47 हजार 459 मतांचा लीड
आमदार संजय सावकारे यांना 47 हजार 459 मतांचा लीड मिळाला असून सलग चौथ्यांदा त्यांनी आपले वर्चस्व भुसावळात सिद्ध केले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आगामी पालिका व जि.प. व पंचायत समिती निवडणुकीतही यश मिळेलच, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये तयार
झाला आहे.

भुसावळ विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते

संजय सावकारे भाजपा महायुती (१०६०९६ )
डॉ राजेश मानवतकर महाविकास आघाडी काँग्रेस ( ५९१४१)
स्वाती कुणाल जंगले (अपक्ष )(९६६३)
जगन सोनवणे (वंचित) (३६६०)
अजय इंगळे (अपक्ष ) ४९९
गौरव बाविस्कर (अपक्ष) १५९
प्रतिभा जगदाळे (अपक्ष) ६४०
सुशील मोरे (अपक्ष) ३८७
राहुल बनसोडे (अपक्ष) ५२६