भुसावळ – मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती मागणी आणि प्रवाशांची गर्दी पाहता पुणे ते दानापूर या मार्गावर विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष गाडीची माहिती खालील प्रमाणे आहे:

पुणे – दानापूर विशेष (60 फेरी)
गाडी क्रमांक 01481 दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ ते २३ डिसेंबर २०२४ पर्यंत दररोज पुणे येथून १९:५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०४:३० वाजता दानापूर पोहोचेल. (३० सेवा)
गाडी क्रमांक 01482 दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ ते २५ डिसेंबर २०२४ पर्यंत दररोज दानापूर येथून ०६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १७:३५ वाजता पुणे पोहोचेल. (३० सेवा)
थांबे: दौड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावल, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर आणि आरा.
संरचना: २ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि २ ब्रेक व्हॅनसह (एकूण १८ डबे).
आरक्षण: गाडी क्रमांक 01481 साठी आरक्षण २३ नोव्हेंबर २०२४ पासून विशेष शुल्कावर उपलब्ध होईल. ही बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वर केली जाऊ शकते.
या विशेष ट्रेन्सच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


