ड्रिंक अँड ड्राईव्ह’, मद्यधुंद अल्पवयीन चालकाच्या स्कॉर्पियो कारने तीन वाहनांना दिली धडक; रिक्षाचालकाचा मृत्यू –


पुणे – अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत स्कॉर्पियो कार चालवत तीन वाहनांना धडक दिली. त्यात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. दोन जण जखमी झाले आहे. अल्पवयीन मुलगा लष्करातील सैनिकाचा मुलगा आहे.

पुणे नाशिक महामार्गावर अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने स्कॉर्पियो कार चालवत तीन वाहनांना धकड दिली. त्यात रिक्षा चालक अमोद कांबळे (वय 27) यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती देताना पोलीस निरीक्षक पंकज महाजन यांनी सांगितले की, अल्पवयीन चालक १७ वर्ष १० महिन्यांचा आहे. तो पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याचे वडील भारतील लष्करात सैनिक आहे. त्या मुलाने मद्यपान केल्यानंतर मित्राची एसयुव्ही कार भोसरीवरुन नाशिका फाट्यापर्यंत वेगाने नेली. त्यानंतर त्या गाडीवरील त्याचे नियंत्रण गेले. त्याने तीन वाहनांना धडक दिली आणि एक डिव्हाडरला ठोकगली.

भरधाव असणाऱ्या एसयूव्ही कारच्या धडकेमुळे ऑटोरिक्षा, एक स्कूटर आणि एक मोटारसायकल यांचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी अदाखल झाले. त्यांनी त्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात रिक्षा चालक कांबळेचा मृत्यू झाला तर स्कूटर आणि मोटार सायकलवर असणाऱ्या दोघे गंभीर जखमी झाले.L

पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 281, 125 (ए), 125 (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या रक्ताचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. अपघात घडला त्यावेळी अल्पवयीन मुलाचा मित्रही त्या गाडीत होता. पोलिसांनी एसयूव्ही कार जप्त केली आहे.