भुसावळ मतदार संघातील एकूण ३१८ मतदान केंद्राकरिता मतदान यंत्रांसह आवश्यक साहित्य वाटप ;

भुसावळ – ,
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता भुसावळ मतदार संघातील एकूण ३१८ मतदान केंद्राकरिता आज दि. १९/११/२०२४ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार नीता लबडे यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय धान्य गोदाम ,तहसील कार्यालय भुसावळ येथून मतदान यंत्रांसह आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले .

या कामी 19 बसेस ,११० छोटी वाहने ,३६ सेक्टर करिता वाहने अशी व्यवस्था करण्यात आलेली होती.एकूण 318 मतदांनकेंद्रापैकी ११ आदर्श मतदान केंद्रे आहेत यात ३ महिला कर्मचारी संचालित( पिंक) मतदान केंद्रे आणि १ युवा संचालित मतदान केंद्र व २ दिव्यांग संचालित मतदान केंद्र आहेत तर उर्वरीत केंद्रे थीम वर आधारित आहेत.१५७ मतदान केंद्रांवर वेब casting व CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत


मतदान यंत्र व साहित्य वाटप करण्याकरिता एकूण २६ टेबल लावण्यात आलेले होते. याप्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला होता व सर्व नेमून दिलेले अधिकारी , कर्मचारी , सेक्टर , नोडल यांनी सुरळीतपणे साहित्य वाटपाची प्रक्रिया पार पाडली.
साहित्य वाटपाची सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली असे निवडणूक नायब तहसीलदार डॉ. अंगद आसतकर यांनी जाहीर केले.