भुसावळ – देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ शाखेच्या वतीने स्वतंत्रता सेनानी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती व जनजातीय गौरव दिन १५ नोव्हेंबर शुक्रवार रोजी साजरा करण्यात आला .


स्थानिक तापीनदी नजीक असलेल्या एकलव्य भिल्ल वस्ती येथे जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित वनवासी महिलेच्या हस्ते माल्यार्पण व पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर तथा कल्याण आश्रमचे प्रांत उपाध्यक्ष डॉ किशोर मोरे यांनी बिरसा मुंडा यांनी आदिवासी जनजाती समाजासाठी दिलेल्या हक्कांच्या लढ्याची माहिती भगवान बिरसा मुंडा यांच्या चरित्रातुन सांगितली .तर जिल्हा महिला सहप्रमुख ऍड. जास्वंदी भंडारी यांनी बिरसा मुंडा यांचे जीवनचरित्रातील ईश्वर म्हणजेच सिंगबोगा एक आहे, गोसेवा करा , सर्व प्राण्यांवर प्रेम करा , व्यसन करू नका, अशुद्ध अन्न खाऊ नका , साधे रहा ,स्वच्छता पाळा घराचे अंगणात तुळशी लावा , मोठयांचा आदर करा वाईट संगत धरू नका , पर धर्मापेक्षा स्व धर्म चांगला , आपली संस्कृती , धर्म , आणि पूर्वज यांचे प्रति अतूट श्रद्धा ठेवा , धर्म संस्कृती समाज यांना विसरू नका यामुळे समाजाची ओळख संपते , एकजूट रहा एकमेकांत भांडू नका , आठवड्यातून एकदा गुरुवारी सिंगबोगा म्हणजे ईश्वराची पूजा करा आदी बिरसा मुंडा यांचे उपदेश बद्दल सविस्तर माहिती सांगितली .

. जिल्हामहिला प्रमुख ऍड चित्रा आचार्य यांनी प्रास्ताविकात देवगिरी कल्याण आश्रम संघटनेचे कार्य जनजाती समाजात कसे चालते याविषयी माहिती दिली जिल्हा कोषाध्यक्ष ऍड जयश्री देशमुख यांनी जनजाती समाजाचा अभिमान असणारी राणी दुर्गावती यांचे जीवनचरित्र कथन केले नगरीय महिला प्रमुख सौ. स्वाती भोळे ,मनीषा देशमुख यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले . सुत्रसंचलन भुसावळ तालुकामहिला सहप्रमुख उज्वला बागुल यांनी केले तर आभार नगरीय महिला सहप्रमुख सौ.विजया निकम यांनी मानले .
यावेळी लहानमुलांना खाऊ वाटप करण्यात आला तसेच उपस्थित महिला व बांधव यांना मतदानाचे महत्व पटवून मतदान का आवश्यक आहे हे सांगून मतदानाबाबत जनजागृती केली . एकलव्य नगरातील सर्व समाजबांधव यांनी मतदान करण्याची शपथ घेतली . कार्यक्रम यशस्वीतेसाठी भिल्ल वस्तीतील कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले


