भुसावळ - भुसावळ विधानसभा मतदार संघात दिनांक १४ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात टपाली मतदान कक्ष लावण्यात आला होता. याप्रसंगी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी आणि होमगार्ड कर्मचारी यांनी टपाली मतदान केले. १६४ पैकी १३५ पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी मतदान केले . २०६ पैकी १९४ होमगार्ड कर्मचारी यांनी मतदान केले अत्यावश्यक सेवेतील ४ पैकी ४ मतदान झाले.असे एकूण ३७० पैकी ३२९ कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार श्रीमती प्रीती लुटे यांनी निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडली.नायब तहसीलदार डॉ.अंगद आसटकर उपस्थित होते.