भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बुधवारी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्कुलच्या प्रिंसीपल नीना कटलर यांनी विद्यार्थी प्रतिनिधींचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तर विद्यार्थी प्रतिनिधींनी प्रिंसीपल यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विवीध प्रकारचे वाद्य वाजवून विदयार्थ्यांनींनी स्वागतगीत सादर केले. स्कुल मधील शिक्षकांनी वेगवेगळे मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून विद्याथ्याचे मनोरंजन केले.स्कूलच्या प्रिन्सिपल नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांना बालदिना विषयी माहिती सांगीतली. तसेच बालदिन का साजरा करतात हे देखील पटवून दिले. व बालदिनाचे महत्त्व सांगितले. तसेच त्यांनी स्कुल मधील शिक्षकांचे आभार मानले.
यावेळी व्हॉइस प्रिन्सिपल मनप्रीत कौर,श्रद्धाली घुले सह शिक्षक वर्ग उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – भुसावळातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बाल दिनानिमित्त द्वीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना प्रिन्सिपल निना कटलर सोबत श्रद्धाली घुले व विद्यार्थी.


