निवडणूक खर्च निरीक्षक यांची भुसावळ विधानसभा मतदारसंघात भेट : १९१ नागरिकांनी केले गृह मतदान ;


भुसावळ –
आज दि. १३/११/२०२४ रोजी निवडणूक खर्च निरीक्षक हरकेश मीना यांनी भुसावळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भुसावळ यांच्या कार्यालयात भेट दिली त्या दरम्यान त्यांनी विविध कामाचा आढावा घेतला व उमेदवारांचे निवडणूक खर्च विषयक पाहणी केली.
आज दि. १३नोव्हेंबर रोजी ६ मतदारांचे गृह मतदान पार पडले. दि. १२/११/२०२४ आणि १३/११/२०२४ या दोन्ही दिवशी एकूण २०१ पैकी १९१ गृह मतदान झाले. ६ मयत असून ४ बाहेरगावी होते. गृह मतदानाची प्रक्रिया अत्यंत चोखपणे राबविण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन पानझाडे यांनी सर्व गृहमतदानाची जबाबदारी पार पाडली.