वरणगांव – वरणगाव येथे मॉल संचालकाने मालमध्ये कामास असलेल्या सतरा वर्षे मुलीचा विनयभंग केल्याचे घटना दहा नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे .
याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार वरणगांव येथील मुलगी श्री माल येथे अकाउंट विभागात कामाला होती .
दहा नोव्हेंबर रोजी तिचे काम संपल्यानंतर रात्री नऊ वाजता तिला घरी सोडण्याचा बहाण्याने मॉलच्या संचालक राजेंद्र जैन यांनी मोटरसायकलवर बसवले व अंधार असलेल्या रस्त्याकडे नेले व गाडीच्या खाली उतरवून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते .
दुसऱ्या दिवशी मुलगी कामाला न गेल्याने व घरी रडत असल्याने तिच्या आईने तिला विचारले असता तिने घडलेला प्रसंग आईकडे सांगितला .
या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव करीत आहेत .



