भुसावळ – दिवाळीच्या निमित्ताने येथील किमया बहुउद्देशीय फाउंडेशनकडून बोरावल येथील बारेला वस्तीवर लहान मुला मुलींना कपडे व दिवाळी फराळ भेट देऊन वस्तीवरील जनजाती बांधवांची दिवाळी गोड करण्यात खारीचा वाटा उचलण्यात आला.
यावेळी वस्तीवर स्वच्छतेविषयी जागृती करून दिवाळ सण का साजरा करतो त्याविषयी माहिती संस्थेचे अध्यक्षा ॲड. जास्वंदी भंडारी यांनी सांगितले तर कोषाध्यक्षा ॲड. जयश्रीताई देशमुख यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले यावेळी उपाध्यक्षा सौ विजया पालखी ऍड. निलेश भंडारी वस्तीवरील कार्यकर्ता लालसिंग बारेला व इतर संस्था सदस्य यांचे सहकार्य लाभले





