जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदार संघात 139 उमेदवार निवडणूक रिंगणात –

जळगाव – विधानसभा सार्वत्रीक निवडणूक-2024 करीता जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या 231 उमेदवारी अर्जांपैकी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवार, 4 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातील 92 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार मतदार संघासाठी एकूण 139 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असल्याची माहिती जळगाव निवडणूक शाखेमार्फत प्राप्त झाली.

विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूकीच्या रिंगणातील उमेदवारांची संख्या (कंसात माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या)

चोपडा- 9 (7)
रावेर- 9 (14)
भुसावळ- 9 (7)
जळगाव शहर- 29 (8)
जळगाव ग्रामीण- 11 (6)
अमळनेर- 12 (4)
एरंडोल- 13 (07)
चाळीसगाव-8 (8)
पाचोरा- 12 (12)
जामनेर-10(12)
मुक्ताईनगर- 7 (17)

139 उमेदवार निवडणूक रिंगणात
सोमवार, 4 नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रीक निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील एकूण 11 विधानसभा मतदार संघात 231 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दरम्यान माघारीच्या अंतिम दिवशी एकूण 92 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात 139 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.