जळगाव – जळगाव जिल्ह्यातील एका तालुक्यात जन्मदात्यानेच आठ महिन्यांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपात तथ्य आहे वा नाही ? याबाबत याबाबत यंत्रणेकडून सखोल चौकशी केली जात आहे.

एका तालुक्यातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन बालिकेवर पित्याने अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. पीडीतेच्या आईने पोलीस स्थानकात धाव घेऊन आपल्या पतीच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पीडीतेने केलेल्या आरोपानंतर पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी सुरू केली आहे.


