सुजग व एकमेकांनी सहयोग जीवन जगण्यासाठी असणारे नियम म्हणजे कायदा …न्यायाधीश एस बी तिवारी

भुसावळ – समाज जीवन जगताना एकमेकांनी सहयोगाने व सुजग पद्धतीने, शिस्तीने वावरण्यासाठी साठी जे नियम आहेत त्यालाच आपण कायदा म्हणतो. संविधानाने अनेक कायदे कायदे केले आहेत त्यापैकी काही कायदे तरतुदी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा बनविले आहे त्यात जेष्ठ नागरिकांच्या मिळकतीचा जो उपभोग घेईल तोच वयोवृद्धांचा सांभाळ करेल अशी तरतूद कायद्यात असल्याचे न्यायाधीश एस बी तिवारी यांनी अष्टभुजा जेष्ठ नागरिक संघात मार्गदर्शन करताना सांगितले .
तालुका विधी सेवा समिती व अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जेष्ठ नागरिकांचे हक्क ,अधिकार व सार्वजनिक उपभोक्त सेवा (पब्लिक युटिलिटी सर्विस) या विषयांवर ज्येष्ठ नागरिकांचे उद्बबोधन झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रागिणी पुराणिक यांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष श्री संजय चापोरकर यांनी भूषविले प्रमुख वक्ते म्हणून दिवाणी न्यायाधीश क.स्तर श्री एस. बी .तिवारी यांनी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व अधिकार काय हे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले

वक्ते ॲड .जास्वंदी भंडारी यांनीही सार्वजनिक उपभोक्ता सेवा( पब्लिक युटीलिटी सर्विस) हा विषय मांडला आरोग्य ,यातायात, बँका ,विमा स्वच्छता विभाग यांचे विरुद्ध सेवा दिली नाही म्हणून तक्रार असल्यास ती तक्रार न्यायालयात न जाता कायमस्वरूपी लोक अदालतीत अर्ज करून न्याय मागता येतो तसेच कश्या पद्धतीने तालुका विधि सेवा समितीचे कार्य कसे चालते यासंबंधी मार्गदर्शन केले व
मृत्यूपत्र का करावे व कसे असावे या विषयावरही दोघं वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अलकाताई ढाके यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री अर्जुन विसपुते यांनी मानले यावेळी ज्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस होता त्यांचा भेटवस्तू देवुन वाढदिवस साजरा करण्यात आला. पसायदानाने व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली .
कार्यक्रमाला ऍड. रायभोले ऍड.निलेश भंडारी, लिपिक तुषार वानखेडे , महेश सपकाळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद उपस्थित होते