भुसावळात पद्मश्री रंगनाथन यांची पुण्यतिथी साजरी :


भुसावळ – शहरातील स्व राजीव गांधी वाचनालय व ग्रंथालय नसरवांजी फाईल येथे आज सकाळी ११वाजता ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री स्व श्री शि रंगनाथ यांची पुण्यतिथि करण्यात आली .

यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष मो मुनव्वर खान व रेल्वेचे निवृत्त तिकीट तपासनीस अधिकारी राजेन्द्र महाजन यानी स्व रंगनाथन यांची प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली .

या प्रसंगी मुनव्वर खान यानी मनोगत व्यक्त करतांना सागीतले की ग्रथालय मुळे लोकांमध्ये ग्रथ अभ्यासाची आवड निर्माण होईल वाचाल तो वाचाल असे म्हणून वाचनालयाचे महत्व पटुन दिले तसेच गावागावात वाचनालयाबद्दल जनजागृति राजीव गांधी वाचनालय तर्फे करण्याचा संकल्प करण्यात आला . या प्रसंगी संचालींका सायरा बानो, कॉग्रेंसचे शहर अध्यक्ष सलीम गवळी ,जे बी कोटेचा यास्मीन बानो,सुमन ताई विलास सावळे ,शकील शेख ,शिला ईदंर परदेशी,आरीज शेख, अलीशा शे , सुधाकर कलकंर , दीपक जैन यांचेसह अनेक पदाधिकारी व वाचक उपस्थित होते