अखेर यावलच्या त्या तरुणाचा मृतदेह सापडला –

यावल – भुसावळात तापी पुलावरून आत्महत्या केलेल्या यावलच्या त्या तरुणाचा मृतदेह सापडला .

तरुणाने मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भुसावळातील तापी नदीच्या पुलावरून नदीत उडी घेतली होती. गुरूवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह अंजाळे जवळील नदीपात्रात सापडला. याबाबत फैजपूर पोलिसांना माहिती देवून मृतदेह यावल रुग्णालयात आणला. सायंकाळी शोकाकुल वातावरणात तरुणावर अंतसंस्कार करण्यात आले.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
यावल शहरातील बोरावल गेट परिसरात लखन संजय कोळी (28) हा तरुण आई-वडील, पत्नी व दोन मुलांसह राहत होता. हा तरुण मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता आपली मोटरसायकल (क्रमांक एम. एच. 19 बी. झेड. 4631) घेऊन भुसावळला गेला आणि त्याने भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावर मोटरसायकल लावली व तेथून नदीपात्रात उडी घेतली होती.

हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. मंगळवारपासून तापी नदीपात्रात या तरूणाचा शोध घेतला जात असताना गुरुवारी दुपारी अंजाळे जवळील नदीपात्रात सागर कोळी, छोटु भोई, भुषण कोळी, ऋषीकेश उर्फ तात्या कोळी, रंजु भिल, गोलु भोई, अमोल धनगर यांना शोध घेत असतांना त्याचा मृतदेह मिळुन आला. तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. येथे शवविच्छेदन करून सायंकाळी तरुणावर अंतसंस्कार करण्यात आले. तरुणाने आत्महत्या का केली ? कळु शकले नाही.