सुदुंबरे – श्री संताजी महाराज जगनाडे (तेली) संस्था सुदुंबरे ची कार्यकारिणी सभा दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी वाघोली येथे पार पडली. श्री संत संताजी महाराजांचे श्री क्षेत्र सुदुंबरे येथील समाधी मंदिराचे विकासासाठी सर्व समाजबांधवांनी जे प्रयत्न केले त्याला यश येऊन महाराष्ट्र शासनाकडून या विकास कार्यासाठी ₹ ६६११.३ लक्ष निधी मंजुर करण्यात आला आहे. तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत विकास आराखड्यानुसार येत्या ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:०० वाजता या विकास कामाचे भूमिपूजन आयोजन करण्यात आले आहे


या सोहळ्यास (उद्घाटन) म रा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी म. रा. विधानसभेतील विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार , मा मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, भा ज प म. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , मा. खासदार रामदास तडस तसेच इतरही पदाधिकारी त्याचप्रमाणे समाजातील उच्च पद विभूषित मान्यवर उपस्थित असणार आहेत. या वेळी श्री क्षेत्र सुदुंबरेच्या निकटचे परिसरातील रहिवासी व जगनाडे महाराजांबद्दल नितांत श्रद्धा असणारे समाज बांधव म्हणून सर्वांनी विशेषतः मावळ, हवेली व खेड तालुक्यातील रहिवासी समाज बांधव यांनी अतिशय मोठ्या संख्येने या कार्यक्रमा वेळी उपस्थित असणे गरजेचे आहे त्यासाठी स्थानिक समिती व तेली समाज संस्था यांनी भूमिपूजन कार्यक्रमाआधी स्थानिक पातळीवर सभांचे आयोजन आयोजन करून समाजामध्ये संदेश पोहोचवणे व जागृती करणे आवश्यक वाटते. गरज पडल्यास श्री संताजी महाराज संस्थानचे पदाधिकारी सुद्धा या सभेच्या वेळी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहतील तरी अशा स्थानिक सभा आयोजित करून सुदुंबरे संस्थाशी संपर्क साधल्यास संस्थानचे पदाधिकारी नक्की येणार आहेत. तरी सर्व समाजबांधव यांनी या भूमिपूजन कार्यक्रमास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम चिर:स्मरणात राहील असा शोभिवंत करावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे .



