भुसावळ
येथील जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळ यांची सर्वसाधारण सभा रविवारी प्रभाकर हॉलमध्ये संपन्न झाली. यावेळी विविध विषयावर चर्चा होऊन पतपेढीचा सभासदांना 15 टक्के डिव्हिडंट मिळणार आहे विविध विषयावरती शांततेत चर्चा होऊन सभा शांततेत पार पडली.
यावेळी सभेचे अध्यक्षस्थानी पतपेढीचे अध्यक्ष गोपाळ पाटील होते. यावेळी उपाध्यक्ष अश्विनी कोळी, मानदचिटणीस गोपाळ महाजन, खजिनदार ज्ञानेश्वर मोझे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद व संशोधक यासह देशासाठी कार्य करणाऱ्या मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानंतर सभेचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी करताना म्हणाले की सभासदांच्या व हितचिंतकांच्या सहकार्याने पतपेढीचा नफा 99 लाख झाला असून एक हजार रुपये सभासदांना अल्पोपहार देण्यात येत आहे. मागील सभेचे इतिवृत्त मानदचिटणीस गोपाळ महाजन यांनी वाचले. यानंतर विविध विषयावर चर्चा होऊन पतपेढीच्या विकासासाठी सभासद संख्या वाढवणे व नफा वाढवण्याबाबत चर्चा संपन्न झाली.
या विषयावर झाली चर्चा
सभेसाठी एकूण 18 विषय होते. यामध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचणे, पतपेढीने सादर केलेल्या वार्षिक मंजुरी देणे, नफ्याची वाटणी व डिव्हीडंट ठरविणे, अंदाजपत्रकापेक्षा कमी झालेल्या खर्चाला मंजूर देणे, नवीन वर्षाचे वार्षिक अंदाजपत्रक मंजूर करणे, हिशोब तपासणीचा अहवाल वाचून दप्तरी दाखल करणे, लेखा परिषक यांचा तपासणी अहवाल वाचणे, अहवालातील शंकांना कार्यकारी मंडळांनी दिलेल्या उत्तर वाचून कायम करणे, हिशोब तपासणी व लेखापरीक्षक यांची नियुक्ती करणे, कर्ज उभारणीचे अधिकार देणे, कार्यकारी मंडळाचे निर्णयाविरुद्ध अपील असल्यास त्यावर विचार करणे, वार्षिक संवर्धन सभेला उपस्थित असलेल्या सभासदांना अल्पोपाहार दिलेल्या खर्चास मंजुरी देणे, जनता अपघात विमा पॉलिसी मुदत संपल्याने रिन्यू करणे, सभासद कल्याण निधी 1000 रुपये घेण्यात येऊन कार्यकारी मंडळांनी मदतीबाबत केलेल्या प्रस्ताव मंजुरी देणे, लेखापरीक्षणात घेतलेल्या शेऱ्यानुसार सभासदांना कर्ज अदा करणे, वार्षिक सर्वसाधारण सभेत हजर नसलेल्या सभासदांच्या अनुपस्थित मान्यता देणे व आयत्या वेळेच विषयावरती चर्चा करणे

एस एस अहिरे यांचा अभिनंदनाचा ठराव
आयत्या वेळेच्या विषयांमध्ये शरद पाटील यांनी 900 रुपये वरून एक हजार रुपये अल्पोपाहार भक्ता एस एस अहिरे यांच्या अर्जामुळे झाल्याने त्यांचा अभिनंदन ठराव करण्याचे मांडले तर नितीन भालेराव यांनी पतपेढीचा हिशोब सभासद यांना मिळावा अशी व्यवस्था करावी, गणेश काकडे यांनी पतपेढीच्या वरच्या मजल्यावर रहिवासाची व्यवस्था करावी अशा सूचना आहे त्या वेळच्या विषयात मांडल्या


