भुसावळ:-महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नंदुरबार येथे २१ वी ज्युनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुले/मुलिंचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार दि. २२ रोजी दुपारी ३ वाजता सेंट्रल रेल्वे स्कूल, रेल्वे हॉस्पिटलच्या पुढे भुसावळ येथे होणार आहे.
राज्य स्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नंदुरबार येथे दिनांक २८ ते ३० सप्टेंबर २०२४ होणार आहे
निवडलेले विद्यार्थी जळगाव जिल्हा संघाकरिता जी. टी.बी कॉलेज ग्राउंड नंदुरबार येथे प्रतिनिधित्व करतील
ज्या मुलांची जन्म तारीख ०१.०९.२००५ वा त्या नंतरची असेल तेच मुले या निवड चाचणीसाठी पात्र असतील सर्व इच्छुक मुलांनी या निवड चाचणीत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. सोबत आधार कार्ड व जन्म दाखला आणावे निवड चाचणी साठी क्रिकेट गणवेशात यावे. अधिक माहितीसाठी जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे जिल्हा सचिव सचिव वासेफ यांच्याशी संपर्क साधावे
कळविले आहे.



