वरणगावात बाप्पाला भक्तीभावाने निरोप…! महिलांचा उत्स्फूर्त सहभाग – एकगाव एक गणपती पाचदेवळी व मानपूर

वरणगाव –
गेल्या दहा दिवसापासून घराघरात आणि गल्लीबोळातील मंडपात विराजमान झालेल्या श्री गणरायाला काल अनंत चतुर्थीस मोठ्या भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणूकीस ढोल ताश्याच्या गजरात डिजेला सुरवात झाली आहे. तसेच एकगाव एक गणपती पाचदेवळी व मानपूर गावात उपक्रम राबविण्यात आला .

वरणगाव शहरातील २७ गणेश मंडळांनी अत्यंत शिस्तबद्ध व शांततामय रीतीने गणरायाचे मिरवणूक काढून विसर्जन केले. पोलिस प्रशासनाने दिलेल्या नंबर प्रमाणे दुपारपासून सुरू झालेली मिरवणूक रात्री १२ नंतर शांततेत सुरू होती. शहरातील खाजगी व सार्वजनिक ८४ गणपतीचे विसर्जन करण्यात आले दुपारी चार वाजता सुरू झालेले मिरवणूक रात्री बारा वाजता शेवटच्या गणपतीने समारोप झाला पोलिसांनी दिलेल्या क्रमानुसार गणेश मंडळाच्या भक्तांनी सहकार्य करत शांततेत मिरवणूक पार पडली त्याचप्रमाणे वरणगाव पोलीस स्टेशन वरणगाव पालिका चातक नेचर क्लब व सिव्हिल सोसायटी यांच्यावतीने निर्माल्य संकलन केंद्र देखील उभारण्यात आले होते.

यामध्ये जवळपास ३५ टन निर्माल्य जमा झाले यातील विघटनशील व अविघटनशील कचऱ्याची विभागणी करण्यात आली विघटशील कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी सुधारणा कचरा पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला तर सिव्हिल सोसायटीने १२५ घरगुती गणपती एकत्र केल्या असून त्यांना पुढील वर्षी पुन्हा वापरण्यात येणार आहे शिस्तबद्ध पद्धतीने हातनुर धरणावर देखील गणेशाला विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीसाठी यंदा २७ सार्वजनिक गणेश मंडळानी सहभाग घेतला आहे. मंडळाचे कार्यकर्ते व व्यवस्था पाहर्णाया कार्यकर्त्यांनी सकाळी विविध वेशभूषा करून मिरवणूकीत शिस्तबधदपणे सहभागी झालेले होते.

पोलिसांचा चोख बंदोबस्त – वरणगाव पोलिस स्टेशनच्या माध्यमातून मुक्ताईनगर पोलिस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शना खाली वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत चौधरी उपपोलिस अधिकारी सुशील सोनवणे,संदिप गांगुर्ड, गोपणीय विभागाचे पोहेकॉ प्रशांत ठाकुर , विजय बावस्कर ,मनोहर बनसोडे , मनोहर पाटील, विकास वाघ, प्रेम सुरवाडे , सुखराम सावकारे, अजय निकम , भूषण माळी ,वाहतुक पोलिस सचिन गुमळकर , फिरोज पठाण यांचे सह ३४ व गृहरक्षक दल ( होमगार्ड ) ४० असे एकुण ७० पदाधिकारी कर्मचारी यांनी विसर्जन मिरवणूकीत चोक बंदोबस्त ठेवण्यात आला .