गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…! साश्रू नयनांनी लाडक्या बाप्पाला अखेरचा भावपूर्ण निरोप : गणेश मंडळासह भक्तांनी दिला बाप्पाला भक्तीभावाने निरोप…! महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभाग : शांततेत मिरवणूक संपन्न :

भुसावळ – भुसावळात भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात विघ्नहर्त्या गणरायाला ढोल-ताशांचा गजरात डीजेच्या तालावर ,फुलांची उधळण करीत शहरातील विविध मंडळांतर्फे निरोप देण्यात आला. एकूण 176 पैकी 40 मंडळ सहभागी झाले होते यावेळी ढोल ताशांच्या गजरात युवा व महिलानी तालावर नाचून मनमुराद आनंद लुटला .

रात्री उशिरापर्यंत गणेशभक्तांमध्ये उत्साह कायम होता. यंदा गुलाला ऐवजी फुलांच्या पाकळ्या व रंगीबेरंगी कागदि बारीक पताकांची उधळण करण्यात आली तसेच मूर्त्यांवर आकर्षक रोषणाईसह फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली .

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…! असे म्हणत साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी अखेरचा भावपूर्ण निरोप दिला सकाळ पासूनच तापीनदीच्या दोन्ही तीरावर राहुलनगर घाट व यावल भागातील घाटावर घरगुती गणपती विसर्जनासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती नदीवर श्रीमूर्ती नदी पात्रात पाण्यात मध्यावर नेऊन विसर्जनासाठी तरफा ठेवले होते सुमारे 25000 हजार घरगुती मगणेश विसर्जन झाले . तर गणेश मंडळांनी दुपारी 1 वाजता मिरवणुकीस प्रारंभ केला रात्री 12 पर्यंत मिरवणुक लक्ष्मी चौक मधून पुढे गेल्या . मात्र 12 वाजता (वाजंत्री ) डीजे बंद करण्यात आले उर्वरित 5 मंडळे विनावाद्य पुढे गेले . .सुमारे साडेअकरा तास मिरवणूक निघाली. कारण मिरवणूक मार्गावर दोन मंडळात असलेले अंतर जास्त होते तसेच एका मंडळाने बैलगाडीवापर केला व त्या मुळे विलंब झाल्याचे दिसून आले रात्री उशिरा व पहाटे पर्यंत तापी तीरावर व गारखेडा , व वाघूर धरण बॅकवॉटर येथे मोठ्या गणपती मूर्त्यांचे क्रेन च्या साहाय्याने विसर्जन करण्यात आले .


लक्ष्मी चौक -जामा मशीद परिसर, मिरवणूक मार्ग, तापी नदीच्या विसर्जन घाटावर बॅरिकेटिंगसह जनरेटर, प्रखर प्रकाश देणारे दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे, अधिकार्‍यांसोबत फिरते कॅमेरे आदी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. पालिका व सहयोगी संस्थांच्या माध्यमातून निर्माल्य संकलन करण्यात येत होते.विघ्नहर्त्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती. मिरवणुक मार्ग नृसिंह मंदिर ते स्टेशन रोडवरील अमर स्टोअर्सपर्यंतच्या मुख्य मार्गाला जोडणारे १४ उपरस्ते बॅरिकेट लावून बंद करण्यात आले होते. दुपारी १२ वाजेनंतर जामनेर रोड अवजड वाहतुकीसाठी बंद होता.

यंदा पुणेरी पाटयांची झलक मिरवणुकीत दिसून आली गणेश मंडळ श्री भक्तांनी संदेश दिले राज्य व देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहे यामुळे प्रबोधनात्मक फलक “मित्रा आपल्या बहिणीसाठी वाघ होतोस , मग इतरांच्या बहिनिकरिता पिसाळलेल्या कुत्रा होऊ नकोस, तसेच मुलींनो कलियुग आहे जवळ शस्त्र ठेवा, म्हणजे वस्त्रहरण होण्याची वेळ येणार नाही , बलात्काऱ्याला फाशी झालीच पाहिजे , कोणी छेडल्यास …वा स्वतः च्या बचावासाठी प्रसंगी वार कर केस तुझा बाप लढविल असे फलक द्वारे संदेश प्रबोधन केले .

यंदा १८ ते २६ उंच व आकर्षक सुंदर गणेश मूर्ती बघण्यासाठी आबालवृद्धांसह महिलानी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती . संपूर्ण मिरवणूक मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात होताव.तर लक्ष्मी चौकात उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील , डीवायएसपी कृष्णांत पिंगळे , तहसीलदार नीता लबडे , मुख्याधिकारी राहुल फातले , तसेच पोलीस निरीक्षक राहुल वाघ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी , होमगार्ड पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पोलीस व पालिका प्रशासनाने केलेली गणपती विसर्जन व्यवस्था उत्तमरित्या केल्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता गणेशोस्तव व मिरवणूक शांततेत पार पडली .